आज त्या पैकी बाबा गनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे.
खुबुस वा पिट्टा ब्रेडला सोबत करण्यासाठी बाबागनुश हे एक प्रकारच डिपिंग आहे.
साहित्य :
एक मोठं किंवा २ माध्यम वांगी.
३ मोठे चमचे ताहिनी. (भाजलेल्या तिळाची तेलात वाटलेली पेस्ट.)
२ लिंबांचा रस.
२-३ पाकळ्या लसूण
चवी नुसार मीठ.
२-३ चमचे ताजं घट्ट दही (ऑपश्नल)
सजावटीसाठी : ऑलीव्हचं तेल, ऑलीव्ह, लाल तिखट, कोथिंबीर.
कृती :
वांग्याला काट्याने टोचे मारून वरून तेलाचं बोट फिरवावं.
निखारे असल्यास उत्तम पण नसल्यास शेगडीवर वांगं भाजून घ्यावं.
(ओव्हन मध्येही भाजता येईल पण त्याला खूप वेळ लागतो साधारण ४५-५० मिनिटे.)
भाजलेलं वांगं गार झाल्यावर वरच साल काढून टाकावं आणि काट्या/चमच्याने वांग्याचा गर मोडून घ्यावा.
एका बाऊलमध्ये ताहिनी आणि लिंबाचा रस फेटून घ्यावा. सुरवातीस फेटताना मिश्रण एकदम घट्ट जाणवेल, पण नंतर हलकेपणा जाणवायला लागेल.
नंतर त्यात आवडी नुसार ताजं दही घालून फेटावं.
वांग्याच्या मोडलेल्या गरावर वरील मिश्रण, लसणाच्या पाकळ्या आणि चवी नुसार मीठ, लाल तिखट टाकून फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून घ्यावं.
साधारण श्रीखंडाची घनता येईल. वाढताना थोडं ऑलीव्ह्च तेल टाकून वरून लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ऑलीव्ह लावून सजवावं.
खबुस किंवा पिटा ब्रेड सोबत डिपिंग म्हणून सर्व्ह करावं.