४ वाट्या ,कोबी १ वाटी ,गाजर १ वाटी ,शिमला मिरची अर्धी वाटी,पनीर १ वाटी ,चीज अर्धी वाटी ,उकडलेले बटाटे २ ,लाल तिखट १ चमचा हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,जीरा पावडर १ चमचा ,आमचूर पावडर १ चमचा ,मीठ चवीप्रमाणे ,तेल २ चमचे ..,पाणी आवशकते नुसार .
कोबी ,गाजर ,पनीर किसून घ्यावे ,उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा ,शिमला मिरची बारीक कापून घ्यावी .
कृती :
सर्व प्रथम कणकेमध्ये मीठ टाकून पाणी घालून मळून बाजूला ठेवून द्यावे . आता एका कढाई मध्ये दोन चमचे तेल घालून तेल तापल्यावर त्यात सर्व प्रथम शिमला मिरची टाकावी .त्यानंतर कोबी ,गाजर टाकावे ,दोन ते तीन मी.परतल्यावर त्यात कुस्करलेला बटाटा टाकावा .
आता सर्व नीट एकजीव करून त्यात लाल तिखट ,हळद ,जीरा पावडर ,गरम मसाला ,मीठ आमचूर पावडर टाकून नीट परतावे.
पाच मिनिटे परतून आच बंद करावी .
मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे आणि मग त्यात पनीर आणि किसलेले चीज टाकून नीट मिक्स करावे .
आता मिश्रण गार होऊ द्यावे.
मिश्रण गार झाल्यावर एका बाजूला कणकेचा एक गोळा घेऊन तो थोडासा लाटून घ्यावा
त्याला थोडे तेल लावून त्याची त्रिकोणी घडी करावी
त्यात तयार मिश्रण भरावे आणि अशा रीतीने बंद करावे.
आता हलक्या हाताने त्रिकोणी आकारात लाटावेत
आणि लाटून झाल्यावर तव्यावर दोन्ही बाजूला तेल लावून शेकावेत.
अशा रीतीने उरलेले सर्व पराठे बनवावेत.
आणि पुदिन्याच्या चटणी किवा दही बरोबर खायला द्यावेत.
