६ वाट्या तांदूळ
२ वाट्या तूरडाळ
२ वाट्या चणाडाळ
२ वाट्या उडीदडाळ
२ वाट्या ज्वारी
१ वाटी गहू
१ वाटी धणे
१/२ वाटी मेथीदाणे
वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा.
साहित्यः
२ वाट्या तयार धिरडे पीठ
१०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते)
१/२ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
२ चमचे तेल
पाकृ:
पिठात हळद, लाल तिखट, ठेचलेले लसूण, मीठ व दोन चमचे तेल घालावे.
एक वाटी पीठ असल्यास २ वाट्या पाणी असे प्रमाण आहे, त्याप्रमाणे पाणी घालून , नीट मिक्स करावे.
नॉन-स्टीक तवा गरम करुन घ्यावा व मंद आच करून थोडे तेल ब्रश करुन, वाटीने पीठ ओतावे.
थोडे तेल सोडून एका बाजूने छान होऊ द्यावे मग उलटवून दुसरी बाजू शिजु द्यावी.

गरम-गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.