साहित्य:
२ मध्यम आकाराची भरताची वांगी
६-७ लसूण पाकळ्या बारीक चिरून
थोडासा लिंबाचा रस
अर्धी वाटी घट्ट दही (मूळ पदार्थात ग्रीक योगर्ट वापरले जाते. घरचे घट्ट दही सुद्धा चालेल. फक्त पाणी अजिबात नको)
चवीपुंरते मीठ
ऑलिव्ह ऑइल
सजावटी साठी कोथिंबीर
कृती:
वांगी गॅसवर खरपूस भाजून घ्या. गॅसचा पर्याय नसेल तर ओव्हन मध्ये भाजू शकता. नंतर वांग्याचे साल काढून गर मॅश करा. यात थोडेसे ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, दही, मीठ, बारीक चिरलेला लसूण (अर्धाच घ्या कारण उरलेला अर्धा फोडणीसाठी हवा आहे) हे सगळे एकत्र करा.
थोडे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उरलेला लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी करा. ती या मिश्रणावर ओता. वरून थोडी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व्ह करा.
तळटीपा:
१. फोडणीची स्टेप पर्यायी आहे.
२. वाळवलेली पुदिन्याची पाने, कांद्याची पात इत्यादी घालून देखील यात व्हेरीएशन करता येईल
३. ओव्हन मध्ये भाजण्यासाठी - वांग्याला थोडे तेल लावून सुरीने किंवा काट्याने टोचे मारून घ्यायचे. ओव्हन २००-२२० डिग्री वर प्रीहीट करायचा. बेकिंग ट्रे मध्ये वांगी ठेवून ५०-६० मिनिटे ठेवायचे. बेकिंग ट्रे च्या ऐवजी केकचे एखादे पसरट पॅन असेल तर तेही चालेल.