मांसाहारी पाककृती

दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

सर्व मांसाहारी (आणि अंडे असलेल्या) पाककृती

दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

Postby DeepakD » Mon Apr 14, 2014 7:00 pm

सोडे (ड्राय प्रॉन्स):



रस्सा:



साहित्यः

१. दुधी - १/२ कि.
२. सोडे - १ वाटि
३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम
४. ओलं खोबरं - १/२ वाटि
५. लसुण पाकळ्या - ४
६. आख्खे धणे - १ चमचा
७. जीरं - १/२ चमचा
८. सुख्या लाल मिरच्या - २
९. हळद - १/२ चमचा
१०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा)
११. तेल
१२. चींचेचा कोळ किंवा १/२ लिंबाचा रस
१३. चवीनुसार मीठ
१४. बारीक चीरलेली कोथिंबीर

कॄती:

१. सोडे स्वःच्छ धुवुन बाजुला ठेवा
२. एका फ्राय पॅन मधे १ चमचा तेल तापलं कि अनुक्रमे त्यात कांदा, लसुण पाकळ्या, खोबरं, धणे-जीरं आणि सुख्या लाल मिरच्या घालुन परता
३. खमंग परतल कि मिक्सरमधे वाटुन त्याची मुलायम पेस्ट करा
४. आता एका नॉनस्टिक पॅन / कढई मधे ५ पळ्या तेल तापलं कि १ चमचा मोहरी घाला
५. मोहरी तडतडली कि हिंग, हळद घाला. आता वाटलेली पेस्ट घालुन परतत रहा
६. कडेने तेल सुटु लागलं कि २ चमचे मसाला घाला
७. मसाल्याचा कच्चा वास गेला कि चीरलेला दुधी आणि सोडे घाला
८. गरजेपुरतं पाणी, लिंबाचा रस घालुन मंद आचेवर रस्सा शीजु द्या. मधुन मधुन पाण्याचं प्रमाण चेक करुन रस्सा ढवळत रहा
९. दुधी शीजला कि गॅस बंद करुन बारीक चीरलेली कोंथींबीर पेरा
१०. गरमागरम रस्सा भाताबरोबर किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर हाणा. आज डब्यात हाच मेनु आणलाय.

टिपा:

१. साहित्यात जो मसाला म्हणालोय जो खासकरुन नॉनव्हेज करता वापरतात पण अगदि नसेलच तर कांदा-लसुण मसाल्यानी पण चव येईल
२. दुधी एवजी वांगी-सोडे पण रस्सा करतात...माझ्या मते ती सीकेपी स्टाईलने अधीक चवीष्ट बनते
३. रस्सा म्हटलं कि बटाटा हा हवाच...तो जरुर घाला. माझा राहिला ;)
DeepakD
Distinguished Chef
 
Posts: 8
Joined: Thu Apr 10, 2014 12:48 pm
Name: Deepak S. Dandekar

Re: दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

Postby manish » Mon Apr 14, 2014 9:12 pm

मस्त दिसतेय! हीच रेसिपी व्हेज मधे कशी करता येईल?
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Re: दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

Postby Pratik » Wed Apr 23, 2014 7:28 pm

आहाहाहा सुकं म्हणजे जीव का प्राण.
दिपक भाव दिल खुश केला.

बादवे हे सोडे नव्हे, ही सुकी करंदी. सोडे म्हणजे मोठी कोलंबी सोलून सुकवलेली असते.

मनिष सुकट काढुन केली तर ती चव कशी येणार? त्यामुळे वरील पाककृतीला व्हेज पर्याय इल्ले.
फार तर दुध्यात चणाडाळ,दही धालून रस्सा करता येईल. पण चव टोटली वेगळीच असणार.
Pratik
Master Chef
 
Posts: 14
Joined: Tue Mar 25, 2014 5:55 pm
Name: Pratik Thakur

Re: दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

Postby Sanika » Mon Apr 28, 2014 12:15 am

दुधी-सोडे आवडता प्रकार. वर दिले आहे ते सुकट आहे.
आम्ही ह्यात कुठलेच वाटण वापरत नाही, फोडणीत लसूण, कांदा, हळद, तिखट, मीठ, एखादं कोकम घालून दुधी व भिजवलेले सोडे घालतो. अंगासरशी रस्सा ठेवतो.

पुढल्या वेळेस असे करुन बघेन.
Sanika
Distinguished Chef
 
Posts: 38
Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
Name: Sanika Nalawde

Re: दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

Postby jaagu » Thu Jul 17, 2014 3:44 pm

छान रेसिपी आहे.
ती वरची सुकट/करंदी/अंबाड ह्या नावाने ओळखली जाते.

सोडे म्हणजे सोललेली कोलंबी. कोलंबी ही मोठी असते.
jaagu
A Cook In The Making
 
Posts: 3
Joined: Thu May 01, 2014 10:41 pm
Name: Prajakta Mhatre


Return to मांसाहारी पाककृती

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 1 guest