शाकाहारी पाककृती
जिर्या-मिर्याचा खाकरा
6 posts
• Page 1 of 1
जिर्या-मिर्याचा खाकरा
साहित्यः
१ वाटी कणीक
१ टीस्पून भाजून, भरडसर वाटलेले / कूटलेले जीरे
१ टीस्पून कूटलेली काळीमिरी
मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून तेल
पाकृ:
कणकेत जीरे, मिरी, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी.
झाकून १५-२० मिनिटे ठेवावी.
कणकेचा छोटा गोळा घेऊन जमेल तितके पातळ लाटावे.
मी मिनी खाकरे बनवलेत , एकसारखे दिसावेत म्हणून डब्याच्या झाकणाने कातून घेतले.
तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
त्यावर कातलेला खाकरा टाकून दोन्हीबाजूने जेमतेम भाजून घ्यावा व लगेज ताटात काढावा.
थोडे तेल / तूप ब्रश करावे व १० -१५ मिनिटे बाजूला ठेवावे.
अश्याप्रकारे सर्व पुर्या / पोळ्या जेमतेम भाजून घ्यावे व थोडे तेलाने ब्रश करुन बाजूला ठेवावे.
तवा मंद आचेवर गरम करायला ठेवावा.
आता तेल लावलेली पुरी / पोळी तव्यावर टाकावी व लाकडी साच्याने (वुडन प्रेस) दाबत सर्व बाजूने चांगली भाजून घ्यावी. उलटवून पुन्हा सर्व बाजूने भाजावी.
आच मंदच हवी, खाकरा चांगला खुसखुशीत भाजला गेला पाहिजे.
अशा पद्धतीने सर्व खाकरे भाजून घ्यावे.
पूर्ण गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
हे खाकरे तुम्ही लोणचं, तुप, चाट मसाला भुरभुरून किंवा नुसतेच चहाबरोबर सर्व करु शकता.
कणकेत थोडी कसूरीमेथी, थोडी ताजी, चिरलेली मेथी, हळद, मिरची घालून मेथी खाकरा बनवता येतो.
पानीपूरी मसाला घालून ही बनवता येतो.
हवे तितके व्हेरीएश्न्स करु शकता.
- Sanika
- Distinguished Chef
- Posts: 38
- Joined: Mon Mar 31, 2014 10:34 pm
- Name: Sanika Nalawde
Re: जिर्या-मिर्याचा खाकरा
माझ्या विनंतीला मान देऊन इथे लिहिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद!
- manish
- Master Chef
- Posts: 184
- Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
- Name: Manish Hatwalne
Re: जिर्या-मिर्याचा खाकरा
मस्त आहे रेसिपी:)
फार टेम्प्टिंग दिसतोय खाकरा!
फार टेम्प्टिंग दिसतोय खाकरा!
- Bosky
- A Cook In The Making
- Posts: 19
- Joined: Tue Mar 25, 2014 6:44 pm
- Name: BoskyTH
Re: जिर्या-मिर्याचा खाकरा
वा! मस्त आहे हा खाकरा!
- neha
- A Cook In The Making
- Posts: 19
- Joined: Tue May 13, 2014 10:01 pm
- Name: Neha Pune
Re: जिर्या-मिर्याचा खाकरा
वा छानच आहे खाकरा. चहाबरोबर तर किटी फस्त होतात तेच कळत नाहि.
- DeepakD
- Distinguished Chef
- Posts: 8
- Joined: Thu Apr 10, 2014 12:48 pm
- Name: Deepak S. Dandekar
Re: जिर्या-मिर्याचा खाकरा
खुपच सुंदर!
- vijayshri.chavarkar
- A Cook In The Making
- Posts: 1
- Joined: Wed Jul 02, 2014 10:56 pm
- Location: Mumbai, Maharashtra, India
6 posts
• Page 1 of 1
Who is online
Users browsing this forum: No registered users and 1 guest